भाषण की रॅप..? भाजप नेते विनीत अग्रवाल शारदा यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल…

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक 2019 साठी देशात सर्वत्र जोरात प्रचार चालू आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि उमेदवार आपल्या मतदारसंघात जाऊन मतं मागत आहेत आणि मतदाराचे लक्ष्य वेधण्यासाठी नवनवीन प्रचाराचे फंडे वापरत आहेत. काही जण थेट मतदाराच्या घरी जाऊन मतं मागत आहेत तर काही जण शेतामध्ये जाऊन पिक कापताना दिसत आहे.

उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये निवडणुक प्रचाराची एक वेगळाच फंडा पहायला मिळाला. मेरठ येथील उमेदवार राजेंद्र अग्रवाल यांच्यासाठी प्रचार करताना एका भाजप नेत्याने आपल्या भाषणात मतं देण्यासाठी ज्याप्रकारे आवाहन केले, ते आवाहन करतानाचा व्हिडीओ हा सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

भाजप नेते विनीत अग्रवाल शारदा यांना मतांसाठी आवाहन करताना एका श्वासात इतक्या वेळेस कमल या शब्दाचा उच्चार केला की, प्रचाराची ती एक वेगळी प्रसिद्धी दर्शवित आहे. त्याचं हे भाषण कमी आणि रॅप जास्त वाटत आहे.

भाजप नेते विनीत अग्रवाल भाषण करताना म्हणाले की, ”आपको सोचना होगा कि आपको कमल चाहिए या क्या चाहिए… कमल… कमल… कमल… कमल… कमल…. कमल… कमल…कमल.. कमल… कमल…कमल.. कमल… कमल…कमल.. कमल… कमल…कमल.. कमल… इतना कमल कर देना, इतना कमल कर देना कि मां लक्ष्मी आपके दरवाजे, घर आने पर मजबूर हो जाए. कमल… कमल…कमल पर बिठा कर राजेंद्र अग्रवाल को तीसरी बार लोकसभा भेज देना. तो आपको लगेगा कि मोदी राम के रूप में आ गए हैं. लक्ष्मण के रूप में योगी आ गए हैं. लक्ष्मण के दतक पुत्र या छोटे भाई के रूप में आज भारत आने वाले हैं. भरत का मतलब… अभी हमारे डिप्टी सीएम केशव प्रसाद मौर्य आने वाले हैं.’

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून मेरठ लोकसभा मतदार संघातून राजेंद्र अग्रवाल हे उमेदवार आहेत. राजेंद्र अग्रवाल हे मेरठ येथून विद्यमान खासदार आहेत आणि याआधी दोनदा ते येथून खासदारकीची निवडणूक जिंकत आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.