नांदेड – देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाण हे आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र नांदेड मध्ये दिसत आहे.
शंकरराव चव्हाण यांनी आपली राजकीय कारकीर्द नांदेड मधून सुरु केली होती. त्यानंतर अशोक चव्हाण हे देखील नांदेड मधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर यावेळेस देखील काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांना नांदेड मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी मुलगी सुजया आणि पत्नी यांनी देखील भाग घेतला आहे.