Entertainment News – ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्री स्टायलिश साडीत दिसत आहे. नुकतीच ती निर्माता आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. यावेळी तिने स्टायलिश साडी नेसली होती. तिची ही साडी खूप चर्चेत आहे. तिने पार्टीत तिच्या लुक्सने लाइमलाइट चोरली. पण, सोशल मीडियावर काही युजर्सला तिचा लूक आवडला नाही आणि त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
पार्टीतील 49 वर्षीय काजोलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती चमकदार साडी, मोकळे केस, उंच टाच आणि साध्या मेकअपमध्ये दिसत आहे. तिने तिच्या साध्या लुकने तिची सुंदरता वाढवली आहे.तिच्या नवीन साडीच्या स्टाइलवर लोक खूप कमेंट करत आहेत. काहींनी या साडीची किंमत शेअर केली आहे. काजोलच्या या साडीची किंमत रिटेल प्लॅटफॉर्म अमेरिकाच्या अधिकृत साइटवर 1,20,200 रुपये इतकी आहे. दरम्यान यावरून आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.