साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल अलीकडेच हैदराबादमध्ये एका स्टोअर लाँचमध्ये सहभागी झाली. स्टोअरच्या लॉन्चिंगदरम्यान एक व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी तिच्याकडे आला. यावेळी त्या व्यतीने सेल्फी घेताना तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याने काजल अस्वस्थ दिसली. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Fan/random Guy Misbehaving with actress #KajalAggarwal in a event🙄🙄 pic.twitter.com/I68WdTbxLl
— Movies & Entertainment (@Movies_Ent_) March 6, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तो फोटो क्लिक करताना तिला स्पर्श करताना दिसत आहे. या व्हिडिओत काजल खूपच घाबरलेली दिसत होती आणि त्या माणसाला तिच्यापासून दूर जाण्याचा इशारा करत होती. या व्हिडिओवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी त्या व्यक्तीच्या वागण्यावर टीका केली आहे.
दुर्दैवाने काजल ही पहिली अभिनेत्री नाही जिच्यासोबत असे घडले आहे. सारा अली खान, अपर्णा बालमुरली, आहाना कुमरा हे काही कलाकार आहेत ज्यांना गेल्या वर्षी कार्यक्रमांमध्ये अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला होता.
२०२२ मध्ये काजलने सिनेमातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता काजलने पुन्हा कमबॅक केले आहे. काजल लवकरच तेलुगु चित्रपट ‘सत्यभामा’ आणि तामिळ चित्रपट ‘इंडियन 2′ मध्ये दिसणार आहे.
काही काजल अग्रवालने तिच्या वर्क प्रोफेशनबाबत सांगितले होते,”मी नेहमीच सिनेमाची खूप मोठी फॅन आहे जिथे मला दमदार भूमिका करायला मिळतात. माझे दोन मोठे रिलीज येत आहेत. सत्यभामा, तसेच भारतीय २. दोन्हीमधील माझी भूमिका खूप चांगली आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला नेहमीच सशक्त सिनेमात पुढे जायचे होते. मी चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे. मी आता आनंदी आहे.’