मुंबई – बॉलीवूडचा चॉकलेट अभिनेता ‘कार्तिक आर्यन’ आपल्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही, त्यामुळेच त्याची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ रिलीज झाल्यापासून फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याचा ‘भूल भुलैया 2’ सर्वाधिक हिट चित्रपट ठरला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल साकारण्यात येत आहे. नुकतंच कार्तिकने आपल्या सोशल मीडिया आकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ‘भुल भुलैया 3’ बद्दल माहिती दिली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन याने सोशल मीडियावर एक छोटा टीझर प्रदर्शित करून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे. ‘हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे….’ या आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. या चित्रपटातही कार्तिकच मुख्य भूमिकेत असेल. त्याच्यासोबत कोण कोण झळकेल, ते मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
View this post on Instagram
दरम्यान, 2007 मध्ये म्हणजेच 16 वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये ही भूमिका अभिनेता अक्षय कुमारने साकारली होती. तसेच पहिल्या भागातील विद्या बालनची भूमिका चाहत्यांना सर्वाधिक आवडली होती. तिने अवनिची भूमिका साकारली होती, जी नंतर मंजुलिकेच्या भूमिकेत समोर येते. मात्र, त्यानंतर ‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यन तसेच अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसून आले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता.