अमृतसर – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती जोरा सिंह यांनी फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (justice zora singh decided to contest faridkot as independent candidate big setback to aam aadmi party)
शिख समुदायाचे आदराचे स्थान असलेल्या गुरुग्रंथ साहिबच्या अवमानना प्रकरणाची चौकशी न्या. झोरा सिंग यांनी केली होती. मात्र त्यांनी दिलेल्या अहवालावर मुख्यमंत्री भगवंत मान आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काहीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे झोरा सिंग यांनी पक्ष सोडला होता.
न्या. जोरा सिंह म्हणाले की, अकाली आणि काँग्रेसप्रमाणेच आम आदमी पक्षही जुमला पक्ष बनला आहे. पक्षात प्रवेश करताना अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी आयोगाच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी आपला शब्द कधीच पाळला नाही. आता मी माझा संदेश लोकांमध्ये घेऊन जाईल. लोकांना जोक्स ऐकायला आवडत नाहीत. आश्वासने पूर्ण करणारा पक्षच आम्हाला आवडतो.