नवी दिल्ली – कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने अटक केलेले आप नेते मनीष सिसोदिया यांनी आज आपल्याला निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा या मागणीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. सीबीआय आणि ईडीच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा या अर्जावर नंतर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. (Manish Sisodia sought interim bail for election campaign)
अटक झाल्यानंतर सिसोदिया यांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याआधी विविध कारणांसाठी अंतरीम जामीन किंवा नियमीत जामीनासाठी अर्ज केले आहेत, परंतु त्यांना अद्याप कोणताही दिलासा कोर्टाकडून मिळू शकलेला नाही.
सिसोदिया यांच्या पाठोपाठ केजरीवालांनाही अटक करण्यात आल्याने आम आदमीपक्षाच्या प्रचाराची धुरा पक्षाच्या दुय्यम नेत्यावर पडली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करून भाजप ही निवडणूक एकतर्फी जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप आम आदमी पक्षाने या आधीच केला आहे.