जस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युझर्सचा डेटा हॅक

बंगळुरू – लोकल सर्च सर्व्हिस जस्ट डायल (Just Dial)चा डेटा हॅक झाला असून १० कोटींपेक्षा अधिक युजर्सची माहिती सार्वजनिक झाली आहे. याबाबतची माहिती सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. डेटा ब्रीच यामुळे जस्ट डायल डेटा लीक झाला आहे.

जस्ट डायलच्या १० कोटींपेक्षा अधिक युजर्सचे नाव, इ-मेल आयडी, मोबाईल नंबर, जन्मदिवस आणि पत्ता सार्वजनिक झाला आहे. यामध्ये कस्टमर केअर नंबर ८८८८८८८८८८ यावर फोन केलेल्या ७० टक्के युझर्सचा डेटा लीक झाला आहे.

राजशेखर राजहरिया यांनी म्हंटले कि, कोणत्याही युजर्सने अॅप अथवा वेबसाईटचा उपयोग न करता एकदाही कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल केला असेल तर त्यांचा डेटा लीक झाला आहे. तसेच राजशेखर यांनी या समस्येवरून जस्ट डायलला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्यापही ही समस्या सोडवली नसून कोणत्याही युझर्सचा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो. काही महिन्यांपूर्वीच जस्ट डायलने वेबसाईमध्ये काही बदल केले होते. यामुळे वेबसाईटवरील युझर्सचा डेटा लीक झाला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.