छत्तीसगड – धनिकरका वन क्षेत्रात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा 

रायपूर – छत्तीसगडमधील धनिकरका येथे गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून, या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. यावेळी सुरक्षाला दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्ग येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी सकाळी ही चकमक सुरु झाली.


सकाळी सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरु केला.आणि त्याला प्रत्युउतर म्हणून या पोलिसांनी सुद्धा गोळीबार सुरु केला. या चकमकी दरम्यान, सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तर यामध्ये एक नक्षलवादी गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. या हल्ल्यामध्ये ज्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला, त्यात नक्षलवाद्यांचा वर्गीसचा सुद्धा समावेश होता. या वर्गीसवर पाच लाखांचे बक्षीस होते. यापूर्वी सुद्धा बिमापूरमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (२६मार्च) रोजी चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.