हडपसर : महापालिका हद्दीतील हडपसर उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. त्यात असलेल्या रुग्णालयावर ताण येत आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने हडपसर येथे सर्व सुविधांसह जंबो कोव्हीड सेंटर उभारावे, अशी आग्रही मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.
हडपसर येथे जंबो कोविड सेंटर व्हावे यासाठी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख, नगरसेविका शहर संघटिका संगीता ठोसर, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, उपशहर प्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, विधानसभा समन्वयक तानाजी लोनकर, विभाग प्रमुख प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर आदिजण उपस्थित होते.
हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे गेल्या आठवड्यात आयुक्त विक्रम कुमार यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती. या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्याने यावर चर्चा करण्यात आली व ग्लायडिंग सेंटर व्यतिरिक्त इतर कुठेही हडपसर परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारले तरी चालेल. हड़पसर येथे जम्बो कोविड सेंटर ची अत्यंत गरज असून नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर हड़पसर येथे पुणे महानगरपालिका च्या वतीने जम्बो कोविड सेंटर उभारावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेची आहे. त्याला महापालिका प्रशासनाने तत्काळ गाभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
तर हडपसर परिसरात प्रामुख्याने माळवाडी, पंधरानंबर, महादेवनगर व इतर भागात देखील लसिकरण केंद्र लवकरात लवकर सुरु करुण लसीचा योग्य तो पुरवठा करण्यात यावा हि देखील मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. या सर्व विषयी आयुक्तांनी स्वतः सकारात्मकता दर्शवली असल्याचे विजय देशमुख यांनी सांगितले.