न्यूयॉर्क – माजी विजेता जुआन मार्टिन डेलपोत्रोने गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा 26 ऑगस्टपासून येथील फ्लशिंग मेडोजवर सुरू होत आहे.
डेलपोत्रोच्या माघारीमुळे अमेरिकन खेळाडू डेनिस कुडला याला मुख्य फेरीत स्थान मिळाले आहे. त्याला या आधी विशेष प्रवेशिका देण्यात आली होती. महिलांमध्ये माजी ग्रॅंड स्लॅम विजेती समंथा स्टोसूर व 15 वर्षीय खेळाडू कोको गॉफ यांना विशेष प्रवेशिका देण्यात आली आहे.