टेनिस लीग स्पर्धेत स्पिडिंग चिताज अंतिम फेरीत

पुणे  – विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्‍स संघाचा 49-33 असा पराभव केला आणि पुणे महानगर जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित पीएमडीटीए कुमारांच्या टेनिस लीग स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील 8 वर्षाखालील मिश्र गटात चिताज संघाच्या नमिश हुडने सृृष्टी सूर्यवंशीचा 4-0 असा पराभव करीत विजयी सुरूवात केली. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात हृतिका कपाळेने जसलीन कटारियाला 4-2 असे हरवित संघाला आघाडी मिळवून दिली. 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्चित धूतने तेज ओकचा 6-3 असा तर मुलींच्या गटात सलोनी परिदाने श्रावणी देशमुखचा 6-1 असा पराभव केला आणि संघाची आघाडी कायम राखली.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने सुधांशु सावंतवर 6-4 असा विजय मिळविला. मुलींच्या गटात अलिना शेखने कौशिकी सामंतला 6-3 असे पराभूत केले आणि संघाची बाजू भक्कम केली.14 वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात अदनान लोखंडवाला व केयूर म्हेत्रे या जोडीने श्‍लोक गांधी व तनिष बेलगलकर यांचा 6-4 असा पराभव केला. 10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात वेद मोघे व रियान माळी यांनी देव घुवालेवाला व नीव गोजिया यांच्यावर 4-0 अशी मात केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

विपार स्पिडिंग चिताज वि.वि फ्लाईंग हॉक्‍स: 49-33- एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: नमिश हुड वि.वि सृृष्टी सूर्यवंशी 4-0 ;10 वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी पराभूत वि सक्षम भन्साळी 1-4; 10 वर्षाखालील मुली: हृतिका कपाळे वि.वि जसलीन कटारिया 4-2 ;12 वर्षाखालील मुले: अर्चितधूत वि.वि तेज ओक 6-3;

12 वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि श्रावणी देशमुख 6-1 ; 14 वर्षाखालील मुले: इशान देगमवार वि.वि सुधांशु सावंत 6-4; 14 वर्षाखालील मुली: अलिना शेख वि.वि कौशिकी सामंत 6-3 ; कुमार दुहेरी मुले: कृष्णा घुवालेवाला व राज दर्डा पराभूत वि चिराग चौधरी व पार्थ देवरूखकर 1-6;

14 वर्षाखालील मुले दुहेरी: अदनान लोखंडवाला व केयूर म्हेत्रे वि.वि श्‍लोक गांधी व तनिष बेलगलकर 6-4 ;10 वर्षाखालील मुले दुहेरी: वेद मोघे व रियान माळी वि.वि देव घुवालेवाला व नीव गोजिया 4-0 ; मिश्र दुहेरी: विश्‍वजीत सणस व श्रावणी पत्की पराभूत वि अर्जुन कीर्तने व माही ग्यान 5-6.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)