UP Police Paper Leak Case। उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपर लीक प्रकरणावर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. भरती मंडळाच्या अध्यक्षा रेणुका मिश्रा यांना पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता राजीव कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाची जबाबदारी देण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये 60,000 हून अधिक कॉन्स्टेबल भरती पदांसाठी 48 लाखांहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा ६ महिन्यांनी पुन्हा घेतली जाणार आहे.
कॉन्स्टेबल भरती पेपर लीक प्रकरणातील त्रुटी आणि एफआयआर नोंदवण्यात निष्काळजीपणामुळे डीजी रिक्रूटमेंट बोर्ड रेणुका मिश्रा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. यानंतर डीजी दक्षता राजीव कृष्णा यांच्याकडे भरती मंडळाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. पेपर रद्द झाल्यानंतर,भरती मंडळाच्या अंतर्गत समितीला अहवाल सादर करता आला नाही. तसेच या प्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला नाही. पेपर लीक झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, अशी कारवाई करू जे एक उदाहरण बनेल, त्यानुसार त्यांनी आज ही कारवाई केली असल्याचे म्हटलं जातंय.
६ महिन्यांनी पुन्हा पेपर होणार UP Police Paper Leak Case।
राज्यात 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. यानंतर पेपर फुटल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला पोलिसांनी पेपरफुटीची माहिती अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र, उमेदवारांचा विरोध पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परीक्षा रद्द केली होती.
कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होईल UP Police Paper Leak Case।
उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळ यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा वेळापत्रक लवकरच जारी करेल. यावेळी विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन यूपीएसआरटीसीच्या बसेस उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत मोफत घेऊन जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, परीक्षा ऑगस्ट 2024 पर्यंत घेतली जाईल, असे वृत्त टाइम्सनाऊ. त्याची माहिती केवळ uppbpb.gov.in या अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.