Nana Patole : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Election Results 2023 ) आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगडमध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसतोय, तर काँग्रेसच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता निसटताना दिसत आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसतोय. फक्त तेलंगणात काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे.
निकालाच्या समोर आलेल्या आकडेवारीवर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी नाना पटोले यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे.
कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच येथील जनतेने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘आमच्या ज्या काही ऋटी होत्या तिथे आम्हाला शिकालया मिळालं. त्या ऋटी आम्ही दुरुस्त करु आणि पुढे जाऊ. काँग्रेस पक्ष कधी बार्गेनिंगमध्ये राहिला नाही. काँग्रेस पक्ष नेहमी देशातील प्रत्येक पक्षाला घेऊन चालणारा पक्ष राहिला आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था आणि देशाचं स्वातंत्र्य हेच काँग्रेसला महत्त्वाचं आहे.
खुर्चीपेक्षा काँग्रेस त्याच विचाराने देशामध्ये लढा देत आहे. जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार आहे. आम्हाला ज्या काही ऋटी आल्या आहेत त्या दुरुस्त करुन आम्ही पुढे जाऊ. लोकसभा निवडणुकीत आम्ही विजय प्राप्त करु’ असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.