हॅमिल्टन: कर्णधार जो रुटच्या दमदान द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात महत्वपुर्ण आघाडी घेतली. अर्थात दोन्ही संघांच्या दमदार फलंदाजीमुळे हा सामना अनिर्णित अवस्थेकडे पोचला आहे.
यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या 375 धावांना उत्तर देताना इंग्लंडने रुटच्या द्विशतकाच्या मदतीने आपल्या पहिल्या डावात 476 उभारल्या. न्यूझीलंडने चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात 2 गडी गमावुन 96 धावा केल्या आहेत. मंगळवारी सामन्याचा अखेरचा दिवस असून आता हा सामना अनिर्णित राहणार हे स्पष्ट झाले आहे.
संक्षिप्त धावफलक
न्युझीलंड पहिला डाव – 375. इंग्लंड पहिला डाव – 162.5 सर्वबाद 476. (जो रुट 226, रोरी बर्न 101, निल वॅगनर 5-124), न्युझीलंड दुसरा डाव – 34 षटकांत 2 बाद 96. (केन विल्यमसन खेळत आहे 37, रॉस टेलर खेळत आहे 31, ख्रिस वोक्स 1-8).