139 जागांपैकी फक्त 29 वाहनतळच विकसित
“ऍमिनिटी स्पेस’मध्ये पार्किंग विकसित करण्याचे धोरण
तब्बल 110 ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने प्रशासनाचीही कोंडी
पुणे – शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीबरोबरच पार्किंग समस्याही उग्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे महापालिकेला पार्किंगच्या जागा विकसित करणे आता क्रमप्राप्त आहे. महापालिकेने विकास आराखड्यात 139 जागा पार्किंगसाठी आरक्षित केल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ 29 जागांवरच महापालिका पार्किंग विकसित करू शकणार आहे, अशी आज परिस्थिती आहे. अन्य तब्बल 110 ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत किंवा पूर्वीपासून तेथे नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रशासनाची कसोटी लागत असल्याचे चित्र आहे.
शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. दरवर्षी हजारो लहान-मोठ्या वाहनांची भर शहराच्या वाहतुकीत पडत आहे. ज्या वेगाने ही संख्या वाढत आहे त्या वेगाने मात्र पार्किंगच्या जागा वाढत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तर, इतर शहरांतून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठीही काही नियोजन नाही. त्यात शहराच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी 139 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील 29 ठिकाणी “मल्टिस्टोरेज’ (बहुमजली) पार्किंग महापालिका विकसित करू शकणार आहे.
“ज्याठिकाणी नागरिक पूर्वीपासून राहात आहेत आणि जेथे अतिक्रमणे झाली आहेत, त्या जागा आपण वेगाने विकसित करू शकणार नाही. अतिक्रमणे काढावी लागणार असून, अन्य ठिकाणी पूर्वीपासून राहणारे जे नागरिक आहेत, त्यांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करावे लागणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे,’ असे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले.
यासाठी महापालिकेच्या मालकीच्या “ऍमिनिटी स्पेस’मध्ये पार्किंग विकसित करण्यासंबंधी बांधकाम परवानगी विभागाला विनंती करण्यात येणार असल्याचेही मुठे म्हणाले.
शहरात एकूण 29 पे ऍन्ड पार्किंगच्या जागा असून त्यामध्ये चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. यामध्ये 11 जागा या शहरात आणि अन्य उपनगरांमध्ये आहेत. यातील जास्तीत जास्त पार्किंगच्या जागा या बहुमजली असून, ते ठेकेदारांमार्फत चालवले जातात. पार्किंगसाठी एका वाहनाला तासासाठी 10 रुपये आकारले जातात.
शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. दरवर्षी हजारो लहान-मोठ्या वाहनांची भर शहराच्या वाहतुकीत पडत आहे. ज्या वेगाने ही संख्या वाढत आहे त्या वेगाने मात्र पार्किंगच्या जागा वाढत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तर, इतर शहरांतून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठीही काही नियोजन नाही. त्यात शहराच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी 139 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील 29 ठिकाणी “मल्टिस्टोरेज’ (बहुमजली) पार्किंग महापालिका विकसित करू शकणार आहे.
“ज्याठिकाणी नागरिक पूर्वीपासून राहात आहेत आणि जेथे अतिक्रमणे झाली आहेत, त्या जागा आपण वेगाने विकसित करू शकणार नाही. अतिक्रमणे काढावी लागणार असून, अन्य ठिकाणी पूर्वीपासून राहणारे जे नागरिक आहेत, त्यांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करावे लागणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे,’ असे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले. यासाठी महापालिकेच्या मालकीच्या “ऍमिनिटी स्पेस’मध्ये पार्किंग विकसित करण्यासंबंधी बांधकाम परवानगी विभागाला विनंती करण्यात येणार असल्याचेही मुठे म्हणाले.
एफएसआयच्या मोबदल्यात जागा विकसित कराव्यात
शहराच्या जुन्या भागातच पार्किंगची समस्या गंभीर आहे. या भागातच पार्किंगचे आरक्षण आहे. पार्किंगच्या जागा विकसित करण्यासाठी महापालिका खासगी विकसकाला दोन एफएसआय देते. त्यामुळे ज्या जागांवर पार्किंगचे आरक्षण पडले आहे, त्यांनी त्या जागा एफएसआयच्या मोबदल्यात स्वत: विकसित करून अथवा त्यांच्या सोयीप्रमाणे त्या विकसित करून महापालिकेला हस्तांतरीत कराव्यात, अशी प्रतिक्रिया महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील सूत्रांनी दिली.