मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर आता पुन्हा पं. नेहरुंचा फोटो शेअर करत मोदींवर टीका केली आहे.
संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची डॉ. लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वतंत्र्य झाला. मला काय मिळाले?, त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले. पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य.नेहरुजी हे म्हटले नाही माझ्या जीवाला धोका आहे., असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
संसद परिसरात घडलेल्या या घटनेचा संदर्भ देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची डॉ.लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते,
देश स्वातंत्र्य झाला. मला काय मिळाले.?
त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले,
पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य.
नेहरुजी हे म्हटले नाही माझ्या जीवाला धोका आहे..! pic.twitter.com/K14kpcWQHC— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 7, 2022
दरम्यान, यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. राजीव गांधी यांच्यावर राजघाट येथे झाडाच्या मागे लपून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या.
त्यापैकी एक गोळी त्यांच्या पी.एस.ओच्या कानाला लागून गेली होती. त्यानंतरही तरीही राजीव गांधी यांनी हसतमुखाने सांगितले होते की ते ठीक आहेत. या घटनेबद्दल माहिती देत त्यांनी मोदींना सुनावले आहे.