उदयनराजेंच्या बालीश चाळ्यांना पाठीशी घालून काय मिळाले ?

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे. ते म्हणतात की “भोसले यांच्या बालिश चाळ्यांना शरद पवारांनी नेहमीच पाठीशी घातले. पवारांचा त्यांच्यावर जीव होता, पण उदयनराजेंनी पवारांना काय दिले ? अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांनी ट्विद्वारे त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘साहेब, उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केलं. साताऱ्यातील जवळच्या सहकाऱ्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घातल. त्यांच्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम केल. साहेब काय मिळाल ?’

भाजपाप्रवेशावेळी बोलातना उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामाचे कौतुक केले. लोकशाहीला मजबूत करण्याचे काम मोदी आणि शाहांच्या नेतृत्वात भाजपा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)