देशातील आघाडीच्या महानगरात अशी काही ठिकाणं आहेत की तेथील जमिनीचे भाव पाहून सामान्य व्यक्तीच्या तोंडचे पाणी पळाल्याशिवाय राहत नाही. पुण्याचाच विचार केला तर कोरेगाव पार्क, विमाननगर यासारख्या भागातील फ्लॅटचे दर अवाढ आहेत. असे असले तरी देशात यापेक्षा कितीतरी अधिक किंमतीचे जमीनीचे भाव असून त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही. देशातील सर्वात महागडे अर्थात मुंबई शहर असून तेथे जमिनीचे किमान दर दहा हजार ते 70 हजार रुपये प्रति चौरस फूट भाव आहेत.
उच्चभ्रु वस्तीत आणि महानगरातील मालमत्तेच्या किंमती अनेक काळापासून सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहिल्या आहेत. यापैकीच काही ठिकाणे एवढी महाग आहेत की तेथे सामान्य व्यक्ती पोहोचू शकत नाही. जसे की दक्षिण मुंबईतील ताडदेव, मुंबईचीचेच वरळी किंवा महालक्ष्मी परिसर. या भागातील मालमत्तेचे दर हे अन्य भागातील दराच्या तुलनेत अधिक आहेत. या ठिकाणी अधिक पैसे खर्च करावे लागतात. ताडदेव येथे मालमत्तेचा दर हा सरासरी 56 हजार चौरस फुट इतका आहे. ताडदेवनंतर वरळी आणि महालक्ष्मी भागाचा नंबर लागतो. तेथे मालमत्तेची किंमत अनुक्रमे 41 हजार 500 आणि 40 हजार चौरस फूट इतका आहे. याशिवाय पेडर रोडचा दर देखील 50 हजार रुपये चौरस फुटापेक्षा अधिक सांगितला जातो. या दराचा विचार केल्यास साधारपणे 800 चौरस फुटाचे घर हे 4 कोटी रुपयापेक्षा अधिक किंमतीचे ठरते. या किंमतीचा विचार सामान्य करुच शकत नाहीत.
2013 पासून 2019 या सहावर्षात नवीन आलिशान प्रॉपर्टीजच्या सरासरी किंमतीच्या आधारावर देशातील दहा महागड्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यात मुंबई महानगर क्षेत्र सर्वाधिक महागडे आहे. त्याचवेळी दक्षिण भारतातील आघाडीचे चेन्नई शहराचा विचार केल्यास नुंगमबक्कमचे नाव पुढे येते. येथे मालमत्तेचा दर हा सरासरी 18 हजार रुपये चौरस फुट आहे. या आधारे नुंगमबक्कमची जागा ही सर्वात महागड्या लोकेशनच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईची एगमोर येथे 15 हजार 100 रुपये चौरस फुट दरासह पाचव्या स्थानावर आहे. तसेच अन्नानगर येथे 13 हजार चौरस फुटाचा भाव आहे. असे असले तरी बंगळूर आणि हैदराबाद येथील कोणतेही स्थान आघाडीच्या दहा ठिकाणात पोचलेले नाही.
– अपर्णा देवकर