पॉप्युलर टीव्ही सीरियल “तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशीने इन्स्टाग्रामवर डेब्यू केले आहे. त्याने 25 जुलै रोजी आपले अकाउंट तयार केले आणि अवघ्या 24 तासांत त्यांचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
दिलीप जोशीचे सहकारी कलाकार अंबिका राजंकर आणि पलक सिधवानीने जल्लोषात स्वागत केले आहे. इन्स्टाग्रामवर दिलीप जोशीने आपली आई आणि भावासोबतचा पहिला फोटो पोस्ट केला आहे.
दिलीपच्या इन्स्टाग्रामवर पदार्पण करण्याबरोबरच अनेक बनावट खातीदेखील दिसू लागली आहेत, जी या बनावट हॅंडलमधून अभिनेत्याची छायाचित्रे शेअर करत आहेत. यावर दिलीप यांनी आवाहन केले की हेच त्याचे मूळ खाते आहे. बनावट खाती तयार केली गेली आहेत, जी आपली नाहीत.
दरम्यान, करोना संसर्गामुळे “तारक मेहता का अल्टा चष्मा’चे शूटिंग थांबविण्यात आले होते. नुकतेच या कार्यक्रमाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शोचे कलाकार आणि क्रू मेंबर सुरक्षा आणि खबरदारीची काळजी घेत शूटिंग करत आहेत.