मुंबई – बऱ्याच दिवसापासून जेट एअरवेज पुन्हा सुरू होईल की नाही याबाबत संदिग्ध परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने जेट एअरवेजची मालकी जालान- कॉलरॉक गटाकडे सोपविण्यास परवानगी दिली आहे.
जेट एअरवेज कंपनीवर बऱ्याच बॅंकांचे कर्ज आहे हे कर्ज परत करण्यास या जालान- कॉलरॉक गटाला 180 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या गटाने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी आम्हाला निकाल पत्र मिळालेले नाही. निकाल पत्राच्या तपासनीनंतर भूमिका स्पष्ट करू असे सांगण्यात आले.
जर 180 दिवसाच्या आत सर्व बॅंकांचे कर्ज परत दिले तर हा गट पुन्हा जेट एअरवेज सुरू करू शकेल असे समजले जाते. या कंपनीने विविध बॅंकांच्या 8,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते कर्ज परत केलेले नाही. त्यामुळे एप्रिल 2019 मध्ये खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे ही कंपनी बंद पडली होती. त्यानंतर या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न चालू आहेत.