नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचा भाव 121 रुपयांनी वाढून 56,236 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 145 रुपयांनी कमी होऊन 68,729 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,898 व चांदीचा दर 23.73 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये व्याजदरवाढ कमी होण्याच्या शक्यतेमुळे डॉलर कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याची मागणी वाढून सोन्याच्या दरात वाढ होत आहे.