चाफळचा जवान राजेंद्र कुंभार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चाफळ – अरुणाचल प्रदेश याठिकाणी इंडियन आर्मीमध्ये नायब सुभेदार या पदावर देशसेवा बजावत असलेले चाफळचे सुपुत्र राजेंद्र अनंत कुंभार (वय 44) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराचे तीव्र झटक्याने र्दुदैवी निधन झाले. ते चारच दिवसापूर्वी सातारा येथील घरी सुट्टीनिमित्त आले होते. आकस्मितपणे घडलेल्या या घटनेची वार्ता त्याच्या चाफळ या मूळगावी समजताच गावावर शोककळा पसरली.

चाफळ, ता. पाटण येथील जुन्या पिढीतील सुप्रसिध्द टेलर अनंत कुंभार यांचे चिरंजीव असलेले राजेंद्र कुंभार हे आर्मीमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. त्यांच्या कामाची पावती म्हणून आजमितीस ते नायब सुभेदार या पदावर काम करीत होते. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मार्गक्रमण करणार्‍या या कुटुंबातील राजेंद्र हे एकुलते एक सुपुत्र होते. त्यांनी दोन बहिणींसह कुटुंबाला चांगलाच आधार दिला.

राजेंद्र हे सध्या पत्नी व दोन मुलांसह जकातवाडी (सातारा) येथे राहत आहेत. चारच दिवसापूर्वी ते सुट्टीवर आले होते. सोमवारी सकाळी मिलटरी कँटीनला साहित्य आणण्यासाठी गेले असता त्यांना कँटीनमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मावळली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.