निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-३)

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-१)

निवडणूक निकालाचे निमित्त – लॉटरी, सट्टा, शक्यता आणि संधी ! (भाग-२)

मागील तीन निवडणुका (२००४, २००९ व २०१४) पाहता, बाजारानं निवडणूक निकालाच्या दिवशी प्रत्येक वेळेस कमीत कमी ५% तेजी अथवा मंदी अनुभवलीय. खालील तक्ता पहा.

वरील तक्त्यानुसार २०१४ साली निफ्टीनं निकालादिवशी ६% तेजी दर्शवली, तर २००९ साली तब्बल १९ % व २००४ साली २%.

परंतु, २००४ साली निकालाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी निफ्टी अनुक्रमे ९% व १८% पडली. म्हणजे कोणत्याही बाजूस ५% हालचाल आपणगृहीत धरू शकतो. आता हीच शक्यता या खेपेस देखील गृहीत धरल्यास, निकालाच्या आदल्या दिवशीच्या म्हणजे २२ मे रोजीच्या भावाच्या वरील बाजूकडील ५% व खाली बाजूकडील ५% जवळील स्ट्राईक प्राईसचे कॉल व पुट ऑप्शन्स खरेदी करून आपण ट्रेडिंग पोझिशन घेऊ शकतो. मागील आठवड्याच्या शेवटास, २३ मे व ३० मे च्या एक्स्पायरीच्या ११००० चे पुट व १२००० चे कॉल यांमध्येच सर्वांत जास्त पोझिशन्स घेतल्या गेलेल्या आहेत असं आढळून येतंय. जोखीम कमी करायची असल्यास, त्याच दिवशीच्या, म्हणजे २३ मे च्या एक्स्पायरीचे कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकतो ज्याचे भाव तुलनेनं ३० मे एक्स्पायरी पेक्षा कमी असतील. वाचकांनी पुन्हा लक्षात घ्यावं की हे व्यवहार लॉटरीच्या व्यवहारासारखे आहेत, तुम्ही कॉल किंवा पुट ऑप्शन खरेदी करताय म्हणजे समजा लॉटरीचं तिकीट खरेदी करताय. त्या बाबतीत निफ्टी कितीही वरती / खालती झाली किंवा अपेक्षेप्रमाणं निफ्टीमध्ये अजिबात हालचाल झाली नाही तरी होणारं नुकसान हे कॉल किंवा पुट च्या खरेदी किमतीइतकंच मर्यादित असणार आहे.

उदा. २२ मे रोजी निफ्टी ११५०० असल्यास त्याच्या ५% वरील स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन म्हणजे १२०७५, यावेळी १२००० किंवा १२१०० चा कॉल ऑप्शन खरेदी करू शकता व बाजार खालील बाजूस गेल्यास कमाई होण्यासाठी १०९०० किंवा ११००० स्ट्राईक प्राईसचा पुट ऑप्शन खरेदी करता येऊ शकतो. समजा, २३ मे ला संपणाऱ्या ११००० स्ट्राईक प्राईस च्या पुट काँट्रॅक्टचा भाव ८० रु. आहे व त्याच एक्स्पायरीच्या १२००० स्ट्राईक प्राईसच्या कॉल ऑप्शनचा भाव ६० रु. आहे. जर दोन्हीचा एक एक लॉट म्हणजे प्रत्येकी ७५ शेअर्सचा लॉट खरेदी केल्यास एकूण गुंतवणूक १०५०० (अधिक दलाली व इतर कर) होत असेल तर जास्तीत जास्त जोखीम ही या रकमेपुरतीच मर्यादित असेल.साधारणपणे गुंतवणुकीच्या तिप्पट अथवा चौपट परतावा मिळाल्यास नफा पदरात पडून घेणं इष्ट ठरू शकतं. जितकी स्ट्राईक प्राईस लांबची तितकी जोखीम कमी  व तेथपर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता देखील कमी, थोडी अधिक थांबायची अथवा जोखीम घायची तयारी असल्यास ३० मे च्या स्ट्राईक प्राईसमध्ये व्यवहार करू शकता येतील.त्यामुळं सरकार स्थापनेच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होवोत वा ना होवोत, या घटनेमध्ये बाजारातून पैसे कमावण्याच्या बाबतीत तरी नक्कीच आशावादी राहूयात ! क्योंकी,“The whole thing is that के भैय्या सबसे बडा रुपैय्या”.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×