एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-१)

मल्टी कॅप आणि प्राप्तीकर सवलतीच्या योजनांना पसंती

म्युच्युअल फंड उद्योगासाठी चालू आर्थिक वर्ष उत्साहात सुरु झाल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात २.८० लाख गुंतवणूकदारांची नवी खाती म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी सुरु करण्यात आली आहेत. आता एकूण या खात्यांची संख्या तब्बल ८ कोटी २७ लाखांवर गेली आहे. अर्थात एकाच गुंतवणूकदाराची अनेक खाती असू शकतात हे गृहित धरले तरी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण केलेली आशा आणि विश्वासार्हता यातून प्रकट होते. मार्च मध्ये या खात्यांची संख्या ८ कोटी २५ लाख इतकी होती.

मल्टी कॅप फंडस्, स्मॉल कॅप फंड, लार्जकॅप फंड, कॉर्पोरेट बॉन्ड्स फंड, ओव्हरनाईट फंडस्, लाँग ड्युरेशन, लो ड्युरेशन फंड अशा विविध वर्गवारीतील इक्विटी आणि डेट प्रकारातील वैयक्तिक खात्यांची संख्या जाहीर करणे सिक्युरिटीज् अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) एप्रिल २०१९ पासून सुरु केले आहे.

एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-२)

सेबीने इक्विटी, बॅलन्स्ड्, ईएलएसएस, लिक्विड आणि गिल्ट या वर्गवारीतील एकूण खात्यांची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे. सेबीकडे असलेल्या अलीकडील आकडेवारीनुसार प्राप्तीकरात सवलत मिळण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठीच्या म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) मधील खाती सर्वाधिक म्हणजे १ कोटी १५ लाख इतकी आहेत. म्युच्युअल फंड क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीच्या एकूण खात्यांचा विचार केला तर ही खाती १४ टक्के इतकी आहेत.

– चतुर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here