Entertainment : ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अनेक स्टारकिडसने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांचा समावेश आहे. या तिघांच्या ही अभिनयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी देखील हा सिनेमा पाहिला असून त्यांनी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचे (Agastya Nanda) कौतुक केले आहे. इतकेच काय तर जावेद अख्तर हे अगस्त्य चाहते झाले आहेत.
जावेद अख्तर यांनी ‘द आर्चीज’ पाहिल्यानंतर त्यांनी अगस्त्यच्या अभिनयाची तोंड भरुन प्रशंसा केली. इतकच नाही तर जावेद अख्तर यांनी अगस्त्याची तुलना थेट ऋषी कपूर यांच्याशी केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी सांगितले की, अगस्त्यचा परफॉर्मन्स पाहून त्यांनी श्वेता नंदाला (अगस्त्यची आई) सांगितले की, तिचा मुलगा स्टार होईल.
अगस्त्य नंदाचे कौतुक करताना जावेद अख्तर म्हणाले, ‘आजकाल आपण माचो आणि टॉक्सिक हिरोंचा ट्रेंड पाहत आहोत, पण अगस्त्य हा एक निरागस हिरो आहे, जो शो ऑफच्या जगापासून दूर आहे. ‘बॉबी’च्या ऋषी कपूरनंतर इतका निरागस हिरो प्रेक्षकांनी पाहिला नव्हता. 50 वर्षांपूर्वी ऋषींच्या पदार्पणानंतर अगस्त्य नंदा हा एक चांगला कलाकार आला आहे. तो सर्व तरुण-तरुणींना खूप आवडेल.’
दरम्यान, अगस्त्य नंदा श्वेता बच्चन-नंदाचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘द आर्चीज’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसंच या सिनेमात सुहाना खान आणि खुशी कपूर हे स्टारकीड्सही दिसले. द आर्चीज 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. यात सुहाना खान, नंदा आणि खुशी कपूरशिवाय वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा यांनेही डेब्यू केले आहे. द आर्चीजचे दिग्दर्शन जावेद अख्तर यांची मुलगी झोयाने केले आहे.