मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवरून जान्हवी पुन्हा एकदा कोणाला तरी डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ही व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा मित्र शिखर पाहारिया हा आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि शिखर यांच्यातील डेटिंगनंतर ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघे बरेच दिवस सोबत देखील दिसले नव्हते. परंतु नुकताच दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या साखरपुड्यातील पार्टी दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी पार्टीमध्ये येताना दिसते तर शिखर तिला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी गेटवर आलेला पाहायला मिळतो त्यानंतर दोघेही सोबत आत जाताना दिसून येतात.
View this post on Instagram
या व्हिडिओनंतर जान्हवी-शिखर यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोघेही पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यापूर्वी देखील शिखर आणि जान्हवी अनिल कपूर यांच्या जन्म दिवसाच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. या आधी अनेकदा तो जान्हवी सोबत दिसून आल्याने त्यांच्यातील अफेअर बाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. जान्हवी शेवटची मिली या चित्रपटात दिसली होती.