मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा सध्या चांगलीच चर्चेत आहे. निमित्त आहे पार्टीच आणि पार्टीतील काही फोटोंचं. साराचे पार्टीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोंची चर्चा होण्याचे आणखी एक प्रमुख कारण देखील आहे. या फोटोमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी अनेक बॉलिवूड स्टार किड्ससोबत पार्ट्यांमध्ये दिसते.
सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. त्यासोबतच सारा मॉडेलिंग देखील करते. आपल्या सोशल मीडियावरील फोटोज आणि व्हिडीओज व्यतिरिक्त साराने काही कमर्शिअल मॉडेलिंग प्रोजेक्ट देखील केले आहेत. सारा क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याच्या देखील चर्चा होत्या परंतु त्या केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट झाले. आता साराच्या व्हायरल फोटोमधील मुलगा नेमका कोन आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
साराच्या अनेक फोटोजमध्ये दिसणारा हा मुलगा ‘ओरहान अवत्रमणी’ आहे. हा तोच मुलगा आहे जो अनेक स्टार किड्ससोबत पार्टी करताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी याचे नाव अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत देखील जोडले गेले होते. आता सारा याच्यासोबत दिसल्याने सोशल मिडीआयवर नेटकऱ्यांनी दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु केल्या आहेत.