मुंबई – जान्हवी कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध कलाकार आहे. ती शेवटची मिली या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. आता जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत एनटीआर ३० या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीचा हा साऊथ डेब्यू चित्रपट असेल. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा प्रसार करणारी ही अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटात आपले नशीब आजमावणार आहे. नुकतच जान्हवीने तिची बहीण खुशीसोबत तिरुमाला मंदिरात दर्शन घेतले.
जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरसोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचली. मंदिरात पोहचताच जान्हवीने बालाजी मंदिरात विधिवत पूजा केली. यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ख़ुशी आणि जान्हवी या बहिणींनी बालाजी चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतल्यानंतर चाहते देखील चांगलेच खुश झाले आहेत.
यावेळी जान्हवी आणि खुशीसोबत त्यांच्या जवळचे काही लोकही उपस्थित होते.जान्हवी कपूरचा चित्रपट NTR 30 चे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला शिवा करत आहेत. ज्युनियर एनटीआरने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली होती.
#WATCH आंध्र प्रदेश: अभिनेत्री जाह्नवी कपूर ने तिरुपति स्थित तिरुमाला बालाजी मंदिर के दर्शन किए औऱ पूजा की। जाह्नवी के साथ उनकी बहन खुशी कपूर ने भी दर्शन किए। pic.twitter.com/3IGwEXUCBt
— ANI_HindiNews (@AHindinews) April 3, 2023
जान्हवी कपूरने आपल्या करिअरची सुरुवात धडक चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिच्या सोबत ईशान खट्टर दिसला होता. एनटीआर 30 व्यतिरिक्त, अभिनेत्री बावल, बडे मियाँ छोटे मियाँ, मिस्टर अँड मिसेस माही आणि तख्त सारख्या प्रोजेक्टमध्ये देखील दिसणार आहे.