ज्युनियर एनटीआरने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांना एक अनोखी भेट दिली आहे. अभिनेता एनटीआर त्याच्या आगामी ‘देवरा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात अभिनेत्याने चित्रपटाची रिलीज डेट आणि पोस्टर जाहीर केला आहे.
1 जानेवारीच्या निमित्ताने, अभिनेत्याने त्याच्या ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले, ज्यामध्ये तो समुद्राच्या मध्यभागी बोटीवर उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने काळ्या पॅन्टसह शर्ट परिधान केला आहे. ज्युनियर एनटीआर वादळाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसते आणि कॅप्शनमध्ये लिहिले, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ‘देवरा’ची फर्स्ट झलक 8 जानेवारी 2024 रोजी पाहायला मिळणार आहे.
देवरा या दिवशी प्रदर्शित होणार
पोस्टरसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टरमध्ये हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे लिहिले आहे.
అందరికీ నూతన సంవత్సర శుభాకాంక్షలు! Wishing you all a very Happy New Year.
Can’t wait for you all to experience the glimpse of #Devara on Jan 8th. pic.twitter.com/RIgwmVA6e0
— Jr NTR (@tarak9999) January 1, 2024
सैफ अली खान आणि जान्हवी कपूर
या अभिनेत्याच्या चित्रपटात सैफ अली खानही दिसणार आहे. या चित्रपटात तो ‘भैरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. सैफच्या वाढदिवसाला त्याचा लूक रिलीज करण्यात आला होता. सैफ व्यतिरिक्त जान्हवी कपूर देखील एनटीआर सोबत दिसणार आहे. हा चित्रपट एनटीआर आर्ट्स आणि युवा सुधा आर्ट्सच्या बॅनरखाली बनवला आहे, ज्यामध्ये अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. सैफ आणि जान्हवीची एनटीआरसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल.