मुंबई – जान्हवी कपूर रिया कपूरच्या बर्थडे पार्टीला शिखर पहाडियासोबत स्पॉट झाली.शिखरसोबत जान्हवी माध्यमांना दिसताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यावेळी जान्हवी अक्षरशः चेहरा लपवताना दिसून आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
याआधी जान्हवी आणि शिखर अंबानी पुत्राच्या साखरपुड्यादरम्यान एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांचं पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. जानव्हीचा मिली हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. तो प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडत आहे. जानवीने वडील आणि निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत काम केले आहे. परंतु सध्या ती तिच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आहे.शिखरसोबत गाडीतून जात असताना ती पुन्हा एकदा स्पॉट झाली. यावेळी तिची रिअक्शन पाहण्यासारखी होती. ती अक्षरशः तोंडावर हात ठेवत, लाजत आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी पाहायला मिळते.
View this post on Instagram
रिया कपूरने तिच्या वाढदिवसानिमित्त एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. कपूर घराण्यातील अनेक लोक पोहोचले होते. यामध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, खुशी कपूर, अंशुला कपूर, हर्षवर्धन कपूर, मोहित मारवाह यांसारख्या लोकांचा समावेश आहे. सगळ्यांच्या नजरा जान्हवी कपूर आणि तिच्या चर्चित बॉयफ्रेंडवर खिळल्या होत्या. दोघेही एकाच गाडीतून आले. यावेळी जान्हवी कपूर अतिशय लाजताना दिसली.याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.