बेल्हे -येथील बॅंक ऑफ इंडिया, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महिलांच्या जनधन खात्यामध्ये केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात प्रत्येकी पाचशे रुपये जमा केल्याने महिलांनी पैसे काढण्यासाठी बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेऊन पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या जात आहेत.
पैसे लवकर काढले नाहीतर पुन्हा खातून रक्कम वर्ग होईल अशी अफवा नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे.
बॅंक कर्मचारी आणि पोलीस सर्व नागरी सोशल डिस्टन्स करून बॅंकेच्या बाहेर रांगा लावताना दिसत आहे.
बॅंकेत ग्राहकांना सोडताना बॅंक कर्मचारी सॅनिटायझरचा वापर करून ग्राहकांचे हात निर्जंतूक करीत आहेत.