जामखेड (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शहरात सकल मराठा समाजाच्यातर्फे एक दिवसीय उपोषणास सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या वतीने या उपोषणास पांठिबा दिला आहे. ‘छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन संभाजीराजेंना पाठिंबा दर्शविला आहे.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु केले असून खासदार संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
यावेळी सकळ मराठा समाजाचे समनव्यक मंगेश आजबे, राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तत्रय वारे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, प्रवीण बोलभट, आण्णासाहेब ढवळे, जयसिंग उगले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी घोडेगाव, खर्डा, पाटोदा, बंदखडक या ग्रामपंचायतीने पाठींब्याचे पत्र दिले आहे.