भविष्यवाणीवर काही जण विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. जगात असे काही भविष्यवेत्ते झाले आहेत, जे त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे जगभर ओळखले गेले. जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्याबद्दल बोलायचे झाले तर सगळ्यांच्या जिभेवर एकच नाव येते, ते म्हणजे ‘बाबा वेंगा’. बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली आहेत, त्यातील अनेक खरी ठरली आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी रशियाबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.
काय होती भविष्यवाणी ?
रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, रशिया ‘जगाचा स्वामी’ बनेल, युरोप नापीक होईल आणि मग रशियाला कोणीही रोखू शकणार नाही. सर्व काही बर्फासारखे वितळेल आणि जे राहील ते व्लादिमीर पुतिन आणि रशियाचे वैभव असेल. रशियापुढे कोणीही येणार नाही आणि तो जगावर राज्य करेल.
असे म्हणतात की, बाबा वेंगा मृत्यूपूर्वी 5079 पर्यंतची भविष्यवाणी करून गेले होते. काही अहवाल असे सुचवतात की त्याच्या अंदाजांपैकी 85 टक्के पर्यंत खरे ठरले आहेत.
कोण होते बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. बल्गेरियाचे रहिवासी असलेले बाबा वेंगा हे फकीर होते. त्यांच्याबाबत म्हटले जाते की, त्याचे अनेक अंदाज खरे ठरले, तर अनेक चुकीचेही ठरले. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. या सर्व भविष्यवाण्या ते कोठे लिहून गेले नव्हते तर ते त्यांच्या अनुयायांना सांगून गेले होते असे सांगितले जाते.