जळगाव- जिल्ह्यातील 46 कोरोना संशयितांचे नमुना तपासणीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 90 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.