आजचा रंग – हिरवा
सहावे रूप : कात्यायनी
शिवपुराणात असा उल्लेख आहे की, देवांनी प्रार्थना केल्यावर कत ऋषींच्या आश्रमात देवी प्रसन्न झाली. ऋषींनी कन्या म्हणून तिचा स्वीकार केला म्हणून तिला कात्यायनी म्हणतात. ही देवी सिंहारूढ आहे. देवीला चार हात आहेत. उजव्या हातात तलवार, कमळ आहे.
डाव्या हाताने ती अभयदान देताना दिसते. या मातेने उन्मत्त अशा महिषासुराचा संहार केला म्हणून तिला महिषासूरमर्दिनी असे म्हणतात. हिला रक्तवर्ण प्रिय आहे. तिच्या उपासनेने रोग, शोक, संताप, भय नष्ट होतात. तसेच जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते. ती ध्येयप्राप्तीसाठी शक्ती प्रदान करते.
संकलन : लेखिका माधुरी विधाटे