बिहार: नागरिकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाणारी बोट उलटली

दोघांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

नवी दिल्ली : बिहारमधील कटिहारमधील महानंदा नदीत एक बोट पलटी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये 40 लोक होते. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 28 जणांना वाचविण्यात आले आहे. सात लोक अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद फोर्स) बचावकार्य राबवत आहे. सुटका केलेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. ही बोट पश्‍चिम बंगालमधील बाजितपूरहून बिहारच्या आबादपूर पोलिस स्टेशन परिसरातील डमडोलियाकडे जात होती. माहिती मिळताच बारसोई उपविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, या बोटीमध्ये प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकल देखील होत्या त्यामुळे बोटीला वजन न पेलल्यामुळे ही बोट उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.