नगर (प्रतिनिधी) – न्यायालयात अनेक खटले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या खटल्यांच्या न्यायदानाचे काम जलद गतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यायालय, वकिल, पोलीस, कर्मचारी यांच्या समन्वय हा आवश्यक आहे. निर्दोषाला वेळेत न्याय दिला गेला पाहिजे, यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत.
प्रक्रियेत काम करतांना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनने नेहमीच सहकार्याची भुमिका ठेवली आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
अहमदनगर सेंट्रल अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्यावतीने जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त,नव्याने रुजू झालेले व बदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार सोहळा पार पडळा. याप्रसंगी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, बार असो.चे अध्यक्ष अशोक कोठारी, जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील,
अॅड.व्ही.डी.आठरे, आर.डी.चव्हाण, एम.एस.लोणे आदि उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश वामन दैठणकर, बदली झालेले न्यायिक अधिकारी आर.डी.चव्हाण, पी.बी.रेमणे, आर.आर. पांडे, व्ही.आर.पाटील, रुजू झालेले एम.एस.लोणे आदिंचा सन्मान करण्यात आला.
नगर जिल्ह्यातील न्यायाधिश व वकिल यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहे. आज काही न्यायाधिश निवृत्त झाले आहे. तर काहींची बदली झाली आहे. तर काही नव्याने रुजू झाले आहेत. या सर्वांच्या ज्ञानदानाचा फायदा जिल्ह्याला झाला आहे, असे ही न्यायाधिश यार्लगड्डा म्हणाले.
यावेळी अॅड.अशोक कोठारी म्हणाले, नगरचे न्यायालय स्थापन होऊन २०० वर्षे झाल्याने त्यानिमित्त १० ऑगस्ट रोजी द्विशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जिल्ह्यात काम केलेल्या न्यायाधिशांना या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर आज उपस्थित सेवानिवृत्त व बदली झालेल्या न्यायाधिशांना या सोहळ्याचे निमंत्रण देत स्मृती गौरव ग्रंथामधील न्यायिक अधिकार्यांच्या फोटोची प्रत न्यायाधियांना यावेळी दिली असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अॅड.व्ही.डी.आठरे व आर.डी.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिव अॅड.योगेश काळे यांनी केले तर आभार फारुक शेख यांनी मानले. यावेळी बारचे ज्येष्ठ सदस्य अॅड.ए.डी.चौधरी, अॅड. शशिकांत गांधी, अॅड.एस.आर.बिहाणी, अॅड.एस.जे.काकडे, अॅड.खंडेलवाल, अॅड.ढगे,
अॅड.अभिजित देशपांडे, अॅड.विजय भगत, अॅड.के.एम.देशपांडे, अॅड.राजेश पुलाटे, अॅड.तरिन शेख, अॅड. दहातोंडे, अॅड.जयंत भापकर, अॅड.साकिब शेख, अॅड.बी.टी.पाटील, अॅड.गौतम कोल्हे, अॅड.एम.डी.पवार, अॅड.आगळे, अॅड.मकासरे, अॅड.जरंडीकर, अॅड.मृणाली वाळूंज आदिंसह बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.