टायगर श्रॉफ आणि “बागी 2’मधील त्याची हिरॉईन दिशा पटणी यांच्याबाबतची चर्चा गॉसिप कट्ट्यावर नेहमीच रंगत असते. हे दोघेजण कुठे कुठे बरोबर असतात आणि काय करत असतात, याच्यावर शेकडो नेटिझन्सचे लक्ष असते. सिने मॅगझीनचे रकानेच्या रकाने या दोघांबद्दलच्या गॉसिपने भरत असतात.
आतापर्यंत या दोघांच्या रिलेशनशिपवर त्यांच्य कुटुंबीयांपैकी कोणीही कोणतीही कॉमेंट केलेली नव्हती. आता मात्र टायगरचे डॅडी जॅकी श्रॉफ यांनी या रिलेशनशिपवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. सलमान खानच्या “राधे’मध्ये जॅकी आणि दिशा एकत्र आले होते. या दोघांचे एकत्र फारच कमी सीन होते.
पण हे दोघे एकमेकांशी कसे बोलतात, यावर अनेकांचे लक्ष होते. टायगरचे डेटिंग सुरू आहे, हे जॅकीने यावेळी मान्य केले. मात्र, कोणाबरोबर हे त्याने सांगितले नव्हते. टायगरने सध्या आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे हे महत्त्वाचे आहे.
त्याचे मॉम, डॅड, बहीण आणि गर्लफ्रेंड यापैकी कोणीही तो आणि त्याचे काम यामध्ये येता कामा नये, असे जॅकीने म्हटले आहे. त्याच्या बोलण्यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे टायगरचे डेटिंग सुरू आहे आणि ते कोणाशी हे आपल्याला माहितीच आहे.