मुंबई – करोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग व्यापून टाकले आहे, आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली होती. अशातच या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारकडून लोकांना फंड जमा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यातही आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होत आहे.
CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं.@narendramodi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2020
पीएम केअरला दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.