ISSF World Cup 2024 Cairo shooting : – इजिप्तची राजधानी काहिरा येथे सुरु असलेल्या इंटरनॅशनल शूटींग स्पोर्टस् फेडरेशनच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नवोदित सोनम मस्करने येथे भारतासाठी रौप्य पदक जिंकले. एक गुणापेक्षा कमी फरकाने मागे पडल्याने सोनमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अन्यथा पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याच्या विक्रमाची तिला संधी होती.
आपल्या पहिल्या विश्वचषकात स्पर्धेत सोनमने रविवारी उशिरा इजिप्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सिटी नेमबाजी रेंजमध्ये आठ महिलांच्या अंतिम फेरीत 252.1 गुण मिळवून रौप्य जिंकले. सुवर्णपदक विजेती जर्मनीची एना जॅन्सेन 253 गुण मिळवत सर्वोच्च स्थानी राहिली. तर पोलंडच्या अनेटा स्टॅनकिविझने कांस्यपदक पटकावले.
Another medal on for Team 🇮🇳 at the #ISSF World Cup, Cairo🥳
Update: #Shooting🔫
Many congratulations to Sonam Uttam Mashkar for winning a shiny #Silver, her second at the event, in the Women’s 10m Air Rifle Event🤩👏👏
Great going Champ👑 pic.twitter.com/c9EMM3ZFLJ
— SAI Media (@Media_SAI) January 28, 2024
याआधी दिव्यांशसिंग पनवारने पुरुषांच्या स्पर्धेत अंतिम फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. तीन दिवसांच्या स्पर्धेनंतर भारत आता दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह सीझन-ओपनिंग वर्ल्ड कप स्टेजच्या शीर्षस्थानी आहे.
ISSF World Cup 2024 Cairo shooting : ‘दिव्यांश सिंग पनवार’ची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी….
सोनम आणि नॅन्सी या दोन भारतीयांनी 632.7 आणि 633.1 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या स्थानावर 60 शॉट्सची पात्रता फेरी पूर्ण करून अंतिम फेरी गाठली होती. सोनम मात्र 24 शॉटच्या फायनलमध्ये तिच्या गटात सर्वात मजबूत होती, पहिल्या पाच शॉट्सच्या मालिकेत तिने 53.0 ने सुरुवातीची आघाडी मिवली होती. ही एक अभूतपूर्व फायनल होती. एना जॅन्सेन आणि सोनमचे स्कोअर एकमेकांच्या इतके जवळ आले होते की 10 शॉट्सच्या शेवटी या दोघींमधील गुणफरक फक्त 0.8 होता.