ISSF World Cup 2024 Cairo shooting : ‘दिव्यांश सिंग पनवार’ची जागतिक विक्रमासह सुवर्ण कामगिरी….

ISSF World Cup 2024 Cairo shooting : भारताच्या दिव्यांश सिंग पनवारने रविवारी काहिरा येथे आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर दुसरीकडे भारताची नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने महिला गटात रौप्य पदक जिंकले.
अंतिम फेरीत दिव्यांशसिंग पनवारने 253.7 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आणि यासह जागतिक विक्रम आपल्या नावावर करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हा विक्रम पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा नेमबाज शेंग लिहाओ याच्या नावावर होता. त्याने गेल्या वर्षी हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 253.3 गुणांसह हा विक्रम केला होता. तर इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोने 251.8 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर सर्बियन नेमबाज लाझर कोवासेविकने 230.6 गुणांसह कांस्यपदक जिंकले. याव्यतिरिक्त या फेरीत भारताचा अन्य नेमबाज अर्जुन बबुता हा 166.1 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला.
New #WorldRecord Alert🚨
Update: #Shooting🔫
Let us all congratulate #TOPSchemeAthlete Divyansh for creating a new World record of 253.7 in the Men’s 10m Air Rifle event and securing 🥇for 🇮🇳 at ISSF World Cup, 🇪🇬.🥳🥳
Absolute legend vibes! Many congratulations champ👏👏 pic.twitter.com/q3ikVLme0t
— SAI Media (@Media_SAI) January 28, 2024
याआधी, टोकियो ऑलिम्पियन दिव्यांश सिंग पनवारने पात्रता फेरीत (Qualification Round) 632.4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि देशबांधव अर्जुन बबुतासह पदक फेरीसाठी पात्रता मिळवली होती. अर्जुन बबुता 630.7 गुणांसह पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. संदीप सिंग 630.4 गुणांसह सातव्या तर रुद्राक्ष बाळासाहेब पाटील 629.3 गुणांसह 11व्या स्थानावर राहिला. मात्र, दोघेही केवळ रँकिंग गुणांसाठी स्पर्धा करत होते.
महिलामध्ये सोनम मस्करला रौप्यपदक…
दिवसाच्या उत्तरार्धात, भारताच्या सोनम उत्तम मस्कर (Sonam Uttam Maskar) हिने इजिप्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सिटी शूटिंग रेंजमध्ये (Egypt International Olympic City Shooting range) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तिची ही पहिलीच ISSF विश्वचषक स्पर्धा होती. सोनमने फायनलमध्ये 252.1 गुण मिळवले आणि जर्मनीच्या ॲना जॅन्सेनपेक्षा 0.9 ने मागे राहिली. ॲना जॅन्सेन हिने सुवर्णपदक पटकावले तर भारताच्या नॅन्सीला (209.5) मागे टाकत पोलंडच्या ॲनेटा स्टॅन्क्युविचने (230.4) कांस्यपदक जिंकले.
Another medal on for Team 🇮🇳 at the #ISSF World Cup, Cairo🥳
Update: #Shooting🔫
Many congratulations to Sonam Uttam Mashkar for winning a shiny #Silver, her second at the event, in the Women’s 10m Air Rifle Event🤩👏👏
Great going Champ👑 pic.twitter.com/c9EMM3ZFLJ
— SAI Media (@Media_SAI) January 28, 2024
याआधीच्या फेरीत सोनमने 633.1 आणि नॅन्सीने 632.7 गुणांसह अनुक्रमे पाचवे आणि चौथे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान, दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह, भारत सध्या वर्षाच्या पहिल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल आहे. यासह भारताने ऑलिम्पिकपूर्वी नेमबाजीत पुन्हा आपली ताकद दाखवली आहे.

