हँगझोऊ :- भारताच्या 17 वर्षीय रोइंग नेहा ठाकूरने मंगळवारी आशियाई खेळ 2023 मध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. नेहा ठाकूरने मुलींच्या डिंगी ILCA4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.(Asian Games 2023: India’s Neha Thakur wins Silver in the Girl’s Dinghy ILCA4 event)
नेहा ठाकूरने 11 शर्यती पूर्ण करून रौप्य पदक मिळवले. नौकानयनातील हे भारताचे पहिले पदक होते.चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (२६ सप्टेंबर) तिसरा दिवस आहे.भारताला तिसऱ्या दिवशी नौकानयनातून पहिले पदक प्राप्त झाले आहे. हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या पदकांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
नेहा ठाकूरने भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले. तिने 32 गुण मिळवून आपली ताकद दाखवून दिली. तथापि, तिचा प्रभावी नेट स्कोअर 27 होता, ज्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर राहिली.
सेलिंगमध्ये (नौकायन) एकूण स्कोअरमधून खेळाडूंचा सर्वात वाईट स्कोअर वजा केला जातो आणि नेट स्कोअर काढला जातो. सर्वात कमी नेट स्कोअर मिळवणारा खेळाडू विजेता ठरतो.
थायलंडच्या नोपासोरान खुनबुंजनने सुवर्णपदक जिंकले. सिंगापूरच्या कियारा मेरी कार्लाइल हिला नेहापेक्षा एक गुण कमी असून तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.