Pooja Hegde And Rohan Mehra| दाक्षिणात्य इंडस्ट्रीतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. दाक्षिणात्यसह तिने बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. सध्या पूजाची कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका वेगळयाच कारणामुळे चर्चा रंगली आहे. पूजा हेगडे तिच्या कथित बॉयफ्रेंड रोहन मेहराबरोबर पुन्हा एकदा दिसली. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वांद्रे येथे पूजा आणि रोहन एकत्र फिरताना पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा शर्ट, ग्रे ट्राउजर व काळे बूट घातले होते. तर रोहननं काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट व सफेद शूज परिधान केले होते. पूजा हेगडे गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वी देखील तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पूजा एका क्रिकेटरला डेट करत असून लवकरच ती त्याच्याशी लग्न करणार आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र तिने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले होते.
#Poojahegde with her boy friend 💔pic.twitter.com/JhtUYaISm8
— Kolly Censor (@KollyCensor) March 31, 2024
कोण आहे रोहन मेहरा ? Pooja Hegde And Rohan Mehra|
रोहन दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. रोहननं २०१८ मध्ये सैफ अली खानबरोबर ‘बाजार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. रोहनचं नाव याआधी तारा सुतारियाबरोबर जोडले होते. परंतु मे २०१९ मध्ये दोघे विभक्त झाले.
पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती सलमान खानबरोबर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. त्यानंतर ती ‘देवा’ आणि ‘सनकी’ चित्रपटात दिसणार आहे. ‘देवा’मध्ये शाहीद कपूरबरोबर ती झळकणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या निमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर अहान शेट्टीबरोबर पूजा ‘सनकी’ मध्ये काम करताना दिसणार आहे.
हेही वाचा:
विक्रांत मेस्सीने लाडक्या लेकासाठी काढला खास टॅटू; शेअर केला फोटो