Arvind Kejriwal Arrest । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसलाय. कारण मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना आता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.आज झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीच्या मागणीवरून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
ईडीच्या वतीने न्यायालयात हजर झालेले एएसजी एसव्ही राजू यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी “केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत. सर्वांना सांगण्याचा उद्देश हाच की भविष्यातही आपण केजरीवाल यांच्या ताब्यात देण्याची मागणी करू शकतो.”असे त्यांनी म्हटले.
या प्रकरणातील अरविंद केजरीवाल यांचा ईडी कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. ED ने आम आदमी पार्टी (AAP) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चच्या रात्री उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मार्चला कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले. त्यानंतर 28 मार्च रोजी त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.
तिहारमध्ये अगोदरच आपचे ३ बडे नेते Arvind Kejriwal Arrest ।
दरम्यान, आता तिहार तुरुंगात अगोदर आम आदमी पक्षाचे ३ बडे नेते कैद आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन या तिघांनाही मद्य धोरण प्रकरणी अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आता त्यांच्या सोबत अरविंद केजरीवाल यांनादेखील तिहारमध्ये रवानगी करण्यात आलीय.
काय आहे ईडीचा आरोप? Arvind Kejriwal Arrest ।
दिल्ली मद्य धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा ईडीने केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे एक्साइज पॉलिसी प्रकरणातच तुरुंगात आहेत.
हेही वाचा
आतिशी, सुनीता केजरीवाल की सौरभ भारद्वाज ? ; दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी ‘यांची’ सर्वाधिक चर्चा