पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या आगामी ‘चमकिला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी OTT वर प्रदर्शित होत आहे. दिलजीत जितका त्याच्या चित्रपट आणि गाण्यांमुळे चर्चेत राहतो तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो.
दिलजीत दोसांझच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अफवा पसरत आहेत की,’गायक विवाहित आहे.’ गायकाने अलीकडेच त्याच्या पालकांसोबतच्या ताणलेल्या संबंधांबद्दल खुलासा केला होता. अशातच गायकाच्या एका मित्राने दावा केला आहे की, तो विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. मात्र या सर्व बातम्यांवर दिलजीतने मौन बाळगले आहे.
रिपोर्टनुसार, गायक-अभिनेताच्या मित्राने दिलजीत दोसांझच्या पत्नी आणि मुलाबद्दल बोलले. लेखात असे म्हटले आहे की,’तो एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि त्याच्या फॅमिलीबद्दल फार कमी माहिती आहे. पण मित्र म्हणतात की त्याची पत्नी अमेरिकन-भारतीय आहे आणि त्यांना एक मुलगा आहे आणि त्याचे आईवडील लुधियानामध्ये राहतात. त्याची पत्नी आणि मुलगा अमेरिकेत राहतात, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.’