नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. दरम्यान, देशातही या नव्या स्ट्रेनने एन्ट्री केली आहे. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन देशासाठी अधिक धोकादायक असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी देशभरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील दिला आहे.
It's unlikely that UK strain, even if it had entered India, is causing a significant effect on our cases & hospitalization. But we need to be extra careful & make sure that we don't let it come in India in a big way: Dr Randeep Guleria, Director, AIIMS Delhi on Corona's UK strain https://t.co/gsDADsHJOT pic.twitter.com/0cnydb8Q2F
— ANI (@ANI) December 30, 2020
ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सावधानता बाळगायला हवी, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, कोरोनाचा नवा प्रकार अधिक संसर्गजन्य असल्याने भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष गटाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असून, त्या दिशेले पावले उचलली जात आहे, असेही डॉ. गुलेरिया नमूद केले.
ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आला असण्याची शक्यता आहे. पण भारतात मागील काही आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल,’ असेही रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.