न्युयॉर्क: काही दिवसांपुर्वी सौदी अरेबियाची सरकारी तेल उत्पादन कंपनी अरामकोच्या दोन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन्ही प्रकल्पांच प्रचंड प्रमाणात नुक्सान झाले होते. यानंतर इराण आणि सौदी मधील प्रादेशिक तणाव वाढला होता. मात्र, इराणने आपन हा हल्ला केला नसून हुथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगत आपल्यावरील आरोप झटकावून लावले होते. मात्र, सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनयांनी या हल्या मागे इराणचाच हात असल्याचे सांगितले आहे.
बोरिस जॉन्सनसध्या अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित रहाण्यास गेले असून यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेतर्फे मिडल इस्टमधील वाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेत ब्रिटन देखील सहभागी होणार असल्याचे जाहिर केले आहे. मात्र, यापुर्वी ब्रिटनने सौदीवरील हल्ल्यास इराणला जबाबदार धरण्यास नकार दिला होता. तर, सौदी अरेबिया आणि अमेरिकेने या पुर्वीच इराणला जबाबदार पकडत कारवाईची शक्यता वर्तविली होती. तर, यावेळी इराणतर्फे देखील प्रत्युत्तराची तयारी सुरू असल्याचे सांगत कोणत्याही कारवाईला आमची तोंड देण्याची तयारी असल्याचे सांगितले होते.
तसेच यावेळी पुढे बोलताना जॉन्सन म्हणाले की, आम्ही आमच्या अमेरिकन आणि युरोपियन मित्रांसोबत काम करत असून लवकरच आखाती प्रदेशात शांतता नांदावी या साठी प्रयत्न करणार आहोत.
प्रादेशिक सुरक्षेसाठी संगठन बनवणार – हसन रुहानी
इराणचे राष्ट्रपती देखील अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित रहाण्यास गेले असून निघण्यापुर्वी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सध्या आखाती प्रदेशात आमच्या सीमा सुरक्षित नहीत त्यामुळे आमच्या प्रादेशिक सुरक्षेसाठी या प्रदेशातील सर्व आखाती देशांना इराणच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करणार आहोत.