बंगळुरू: भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरन हेन्ड्रींक्सला धक्का दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून कोहलीस ताकीद देण्यात आली आहे तसेच त्याच्या नावावर एक पेनल्टी (डीमेरीट) गुणही देण्यात आला आहे.
या सामन्यातील 5 व्या षटकांत कोहलीने धावा काढताना हेन्ड्रींक्सला धक्का दिला असल्याचा मैदानावरील पंचांनी सामन्याधिकाऱ्यांकडे अहवाल दिला. त्यामुळे आयसीसीच्या नियमामुसार कोहलीवर कारवाई करण्यात आली आहे. कोहलीस या पेनल्टी (डीमेरीट) गुणासह आतापर्यंत तीन डीमेरीट गुण मिळाले आहेत.
यापूर्वी आफ्रिकेविरूद्ध गतवर्षी त्याला पहिला डीमेरीट गुण मिळाला होता. पुन्हा इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या वेळी अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात अशाच कारवाईस सामोरे जावे लागले होते.