पुणे : IPL 2022 मध्ये आज 46 वा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे याच्या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 203 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या, तर डेवॉन कॉनवे ८५ धावांवर नाबाद राहिला.
या सामन्यात टाॅस जिंकून हैदराबादच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने वादळी खेळी केली, पण त्याचं शतक एका धावेनं हुकलं. ऋतुराज 57 चेंडूमध्ये 99 धावा करून आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा ओपनर डेवॉन कॉनवेनेही चांगली साथ दिली.
Innings Break!
A 182 run opening stand between Gaikwad and Conway as @ChennaiIPL post a formidable total of 202/2 on the board.
Scorecard – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/633jq3TPbn
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
ऋतुराज आणि कॉनवे यांच्यात 17.5 ओव्हरमध्ये 182 धावांची भागिदारी झाली. ही भागीदारी आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी भागीदारी ठरली आहे. डेवॉन कॉनवेने 55 चेंडूमध्ये नाबाद 85 धावा केल्या. त्याने 8 चौकार आणि 4 षटकार लगावले . ऋतुराज आणि कॉनवेच्या या वादळी खेळींमुळे सीएसकेने 20 षटकांमध्ये 2 बाद 202 एवढ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून टी. नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या.